Monday, June 3, 2013

Tender Coconut 
मुंबईत असताना चौपाटीवर जाऊन शहाळं  पिऊन आतली मलई खरवडून खायची मजा काही औरच! पण इथे तो योग आला Miami त. South Beach वर जाण्यासाठी आम्ही निघालो होतो तेव्हा एक नारळवाला दिसला. गुडीयाने तोपर्यंत शहाळं पाहिलंही नव्हत. आमच्या मुंबईत नारळवाले कोयत्याने नारळ फोडतात. पण इथल्या मायामीकर नारळवाल्याचे उपकरण वेगळच होतं. त्याने म्हणे शहरातल्या नारळाच्या झाडांवरचे नारळ उतरवले होते आणि ते एका supermarket च्या कार्ट मध्ये ठेवले होते.
 
आमच्यासाठी खास (बर का!;-) त्याने एक शहाळं निवडलं आणि त्या कार्टवर अशी काही आपटायला सुरुवात केली की त्या शहाळ्याची शकलं झाली. मग त्याने ते हाताने सोलून आतला नारळ बाहेर काढला. दुसऱ्या एका नारळावर आपटला. मस्तपैकी straw खोचून तो आम्हाला दिला. पाणी अतिशय गोड होतं पण आमचा मुंबईकर शहाळवाला कसा नारळाचा एक तुकडा  आतली मलई खाण्यासाठी देतो, ती मात्र सोय नव्हती. पण तरीही मजा आली.

Thursday, May 30, 2013

Rajma Tacoअमेरिकेतले माझे पहिले वाहिले दिवस खाण्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. आमच्या cafeteriaत मिळणारं जेवण खूपच वेगळं होतं. त्यात मला cheese अजिबात आवडत नाही . त्यामुळे खायचं काय हा अगदी मोठ्ठा प्रश्न असे. माझा असा गोड गैरसमज होता की माझी खाण्याच्या बाबतीत काहीही तक्रार नाही. पण इथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी खोड काढत होते. Vegetable Soup मागवलं तर त्यात beef broth असायचा. Mac n Cheese, Pizza, baked Potatoes या सगळ्यात cheese नाही तर sour cream असायचं. बरं , आपल्याला नेमकं काय आवडेल हेच माहीत नसल्याने मी अमुक एक गोष्ट घालू नका हे सुद्धा सांगू शकत नव्हते.
तरी बरं , मी "मत्स्याहारी /मांसाहारी /Non Vegetarian" गटात मोडणारी होते. म्हणजे chicken, seafood आणि अंडी मी खाऊ शकत होते. माझ्या मैत्रिणीने मला "Wendies Spicy Chicken Sandwich #6" try करायला सांगितलं. पण एवढाला मोठा chickenचा तुकडा मला खातच येईना. Subwayतल Veggie Patty Sandwich? त्यात cheese आणि mustard/mayo मुळे मला आवडलं नाही. Burger King/McDonalds मधल्या Fish Sandwichमध्ये परत cheese/tartar sauce असायचं. Taco Bell मधल्या bean burritto मधलं अगदी पार पिठलं झालेले beans, मोडाच्या उसळी खाण्याची सवय असलेल्या माझ्या जिभेला सहन होईनात. पण, शेवटी आपल्यालाही सवय होते. कुठेही बाहेर खायचं असलं की काय काय घालू नका याची मी अगदी लांबलचक यादीच serverला सांगायचे. आमच्या group मधला एक मित्र तर मला नेहेमी चिडवायचा की एकदा ते लोक तुलाच आत त्यांच्या kitchen मध्ये नेतील आणि तुमचं तुम्हीच बनवा असं सांगतील.
नंतर लग्नानंतर, थोडे काही फेरफार करून मी हे नवे पदार्थ घरी करायला लागले आणि मला ते आवडलेही. राजमा Taco हा असाच एक माझा स्वनिर्मित पदार्थ!:-)
राजमा Taco
साहित्य
१ Taco packet (12 tacoes)
२ कप उकडलेले राजमा
मीठ चवीनुसार
१/२ कप salsa
१/२ टीस्पून जिरे पूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून काश्मिरी मिरची पूड
१ कप बारीक चिरलेले lettuce
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ लहान लिंबू
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला tomato
१ टेस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात
आवडीनुसार cheese , sour cream
कृती
१. उकडलेल्या राजम्यात मीठ, हळद, तिखट आणि salsa घाला. Gas वर ठेवून चांगले ढवळा. काही मिनिटातच पाणी आटेल तेव्हा gas बंद करा. बऱ्यापैकी थंड होऊ दे. लिंबू पिळून ढवळून घ्या.
२. Packet वरील सूचनेनुसार taco shells bake करून घ्या.
३. प्रत्येक taco आपापल्या आवडीनुसार राजमा, कांदा, tomato , कोथिंबीर , lettuce , कांद्याची पात , cheese/sour cream घाला.
४. आवडत असल्यास hot sauce घालू शकता.
टीप
१. हा लगेचच खाण्याचा प्रकार आहे. आधी करून ठेवल्यास अगदीच मऊ पडेल.

Saturday, May 25, 2013

Broccauliflower Upkari 
 
"Research shows that ...." या वाक्याचा मी हल्ली धसकाच घेतला आहे. आपण मारे आरोग्यासाठी उत्तम म्हणून एखादी गोष्ट आहारात नियमितपणे वापरावी किंवा नियंत्रित करावी आणि लगेच काही महिन्यात त्याच्या अगदी विरुद्ध वाचायला मिळतं. सोयाबीन, दूध, गहू, मका, अंडी, मासे (Mercury content/farmed or caught in wild), nonstick भांडी, microwave...
म्हणजे नक्की खायचं तरी काय? या यादीत आत्ता भर पडली आहे ती खोबरेल तेलाची. अगदी परवा परवापर्यंत Sautrated Fats साठी उपेक्षित राहिलेलं खोबरेल तेल आत्ता म्हणे आरोग्यवर्धक आहे. अर्थात आमच्या कोंकणी /सारस्वती स्वयंपाकात खोबरेल तेलाचा वापर असतोच म्हणा. पण गेल्या आठवडयात गुडीयाबरोबर "Whole Foods" मध्ये चक्कर मारताना "sample" साठी बिस्किटावर घट्ट खोबरेल तेलाचा लोण्यासारखा थर लावून चाखायला देत होते. वर खोबरेल तेल कस आरोग्यवर्धक असतं याबद्दल एक पुस्तिका! म्हणजे आमच्यासारख्या सतत गोंधळलेल्या ग्राहकांच्या गोंधळात आणखी भर! कसं ठरवायचं काय आरोग्याला चांगलं आणि काय वाईट ते?
मी हल्ली वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या वापरायला सुरुवात केली आहे. अशा भाज्यांमध्ये antioxidants भरपूर असतात. आता मी मारे antioxidants भरपूर म्हणून वापरणाऱ्या भाज्या genetically modified नसाव्यात आणि "organic" हा शिक्का असतो त्यामुळे त्या बहुदा अपायकारक तरी नसाव्यात हीच सदिच्छा!
आजची भाजी आहे "brocauliflower" ची! या भाजीची चव फ्लॉवरसारखीच असते पण फिक्कट हिरवा रंग असतो. मी ही भाजी कोंकणी पद्धतीने करायचं ठरवलं . त्यामध्ये विशेष मसाल्याचा मारा नसतो. मी फोडणीत खोबरेल आणि गोड्या तेलाचं मिश्रण घातलं आणि मोहरी,हिंग, उडीद डाळ, कढीलिंब , सुकी मिरची वगैरे घातली. अशा पद्धतीने केलेल्या भाजीला आम्ही उपकरी म्हणतो. बऱ्याचदा एखादी नवी भाजी करायची म्हटली की मी अशी उपकरी करते म्हणजे नव्या भाजीची चव चागली कळते.
Broccoliflower उपकरी
साहित्य
१ Broccoliflower
चवीनुसार मीठ
चवीनुसार थोडं खोबरं
फोडणीसाठी -
खोबरेल तेल किंवा गोडं तेल किंवा दोन्ही तेलं
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हिंग
१ टीस्पून उडीद डाळ
कडीपत्त्याची काही पाने
२-३ सुक्या मिरच्या
कृती
१. flower चे तुरे काढून मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
२. एका कढईत आवडीनुसार तेल घाला.
३. फोडणीचे साहित्य घालून खमंग फोडणी करून घ्या.
४. flower चे तुरे घालून चांगलं ढवळून घ्या.
५. झाकणावर पाणी ठेवून शिजू दया.
६. मीठ आणि खोबरं घाला.
टीप
१. ही भाजी फार शिजवू नये.
२. तुमच्या आवडीनुसार कुठचेही तेल वापरू शकता पण खोबरेल तेलाचा स्वाद या भाजीची चव नक्कीच वाढवतो.

Tuesday, May 21, 2013

Lemon Cupcakesगुडीयाच्या शाळेत मे महिन्यातला एक आठवडा "Teacher's Appreciation Week" म्हणून साजरा करतात. आपल्याला teacher च्या आवडीची एक list मिळते. (Favorite color पासून favorite flowers पर्यंत). सगळीच मुले आपल्या टीचर साठी काही तरी खास करायला उत्सुक असतात. मग या list मधून ते एखादी छोटीशी भेट आपल्या वर्गशिक्षिकेला देऊ शकतात. अर्थातच, हे सगळ पूर्णपणे optional असत.
काही पालक baking volunteers असतात. मी ही संधी बरी जाऊ देईन! त्यामुळे या वेळी "Lemon Cupcakes" करायचे ठरले आणि आम्ही सगळ्याजणींनी (सगळ्या Momsच होत्या!) ही अगदी सोप्पी recipe वापरली.
Lemon Cupcakes
साहित्य
१ Pack Lemon Cake Mix
१ Pack (3.4 oz) Instant Vanilla Pudding Mix
३/४ कप तेल
४ अंडी
१ कप लिम्का किंवा 7-up

Frosting
तुमच्या आवडीचे कुठचेही readymade frosting. (शक्यतो lemon वापरावे )

सजावटीसाठी
१ टेबलस्पून Lemon Zest (लिंबाची किसलेली साल)

कृती
१. Oven 325F तापवून घ्या. Cupcake Liners ठेवा.
२. Cake mix व pudding mix एकत्र मिसळून घ्या.
३. त्यामध्ये तेल, अंडी (एकेक करून), लिम्का घाला. Electric Mixer असल्यास उत्तम. चांगले मिसळून घ्या.
४. केकचे मिश्रण एकेका कप मध्ये घाला.
५. साधारणपणे १८ -२ मिनिटे बेक करा. नीट बेक झाले आहे कि नाही हे पाहण्यासाठी एक छोटीशी toothpick एका cupcakeच्या मध्यभागी खोचून पहा. जर toothpick ला काही मिश्रण लागल नसेल तर केक तयार आहे!
६. Cupcakes पूर्णपणे थंड होऊ द्या. तोपर्यंत दुसरी batch बेक करून घ्या .
७. सर्व केक्स थंड झाल्यावर आपल्या आवडीनुसार lemon frosting फ़ासा .
८. थोडी lemon zest भुरभुरवा.

टीप
१. आम्ही Duncan Heines brand वापरला होता.

Credits
http://allrecipes.com/recipe/lemon-bundt-cake/

Friday, May 17, 2013

Mango Tree in Fort Lauderdale"Floridian" हे Fort Lauderdale मधले अगदी प्रसिध्द restaurant. त्याबद्दल मी नंतर लिहिनच. आम्ही तिथे जाण्यासाठी एका झाडाखाली गाडी पार्क केली आणि मी जवळजवळ किंचाळलेच. ज्या झाडाखाली आम्ही होतो ते चक्क आंब्याचे झाड होत. नक्कीच Mexican आंब्याचं असावं  पण तरीही May महिन्यात अगदी आंब्यांनी लगडलेल झाड दिसावं आणि तेही थेट अमेरिकेत ! :-D

Thursday, April 11, 2013

Shrikhandनमस्कार  मंडळी ! नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी माझा ब्लॉग आता माझ्या मातृभाषेत  - मराठीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. फार दिवसापासून माझी ही इच्छा होती. पाहूया  कसं आणि कितपत जमतंय  ते !


खास गुढी पाडव्यासाठी आज मी सादर करतेय श्रीखंडाची कृती .  श्रीखंड म्हटल्यावर अजूनही मला आई चक्का करण्यासाठी दही टांगून  ठेवायची ते दिवस आठवतात . अर्थात तेव्हाही बाजारात चक्का  मिळत असे .

आता अमेरिकेत मी ग्रीक योगर्ट वापरून श्रीखंड तयार करते. हे श्रीखंड अगदी काही मिनिटात तयार होते . 


श्रीखंड
साहित्य -
१ डबा ग्रीक yogurt - full  fat  वापरल्यास उत्तम
३/४ - १ कप साखर
चिमुटभर मीठ

१/२ टी स्पून चारोळ्या
२ वेलच्या / वेलदोडे , साली काढून  आणि कुटून
१ टे स्पू कोमट दूध + थोडे केशर

कृती -
१. ग्रीक योगर्ट, मीठ  आणि साखर चांगले मिसळून घ्या
२. वेलदोड्याची पूड आणि केशर मिश्रित दूध घालून चांगले ढवळा.
३. वरून चारोळ्या पसरवा.

टीप -
१. Fat free किंवा reduced fat दह्याचेसुद्धा श्रीखंड माझ्यामते चांगले लागते.
२. महाराष्ट्रीय पद्धतीचे श्रीखंड अति गोडंगोड नसते. आपल्या आवडीनुसार साखर वापरावी.