Thursday, April 11, 2013

Shrikhandनमस्कार  मंडळी ! नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी माझा ब्लॉग आता माझ्या मातृभाषेत  - मराठीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. फार दिवसापासून माझी ही इच्छा होती. पाहूया  कसं आणि कितपत जमतंय  ते !


खास गुढी पाडव्यासाठी आज मी सादर करतेय श्रीखंडाची कृती .  श्रीखंड म्हटल्यावर अजूनही मला आई चक्का करण्यासाठी दही टांगून  ठेवायची ते दिवस आठवतात . अर्थात तेव्हाही बाजारात चक्का  मिळत असे .

आता अमेरिकेत मी ग्रीक योगर्ट वापरून श्रीखंड तयार करते. हे श्रीखंड अगदी काही मिनिटात तयार होते . 


श्रीखंड
साहित्य -
१ डबा ग्रीक yogurt - full  fat  वापरल्यास उत्तम
३/४ - १ कप साखर
चिमुटभर मीठ

१/२ टी स्पून चारोळ्या
२ वेलच्या / वेलदोडे , साली काढून  आणि कुटून
१ टे स्पू कोमट दूध + थोडे केशर

कृती -
१. ग्रीक योगर्ट, मीठ  आणि साखर चांगले मिसळून घ्या
२. वेलदोड्याची पूड आणि केशर मिश्रित दूध घालून चांगले ढवळा.
३. वरून चारोळ्या पसरवा.

टीप -
१. Fat free किंवा reduced fat दह्याचेसुद्धा श्रीखंड माझ्यामते चांगले लागते.
२. महाराष्ट्रीय पद्धतीचे श्रीखंड अति गोडंगोड नसते. आपल्या आवडीनुसार साखर वापरावी.

 

No comments:

Post a Comment