Thursday, May 30, 2013

Rajma Tacoअमेरिकेतले माझे पहिले वाहिले दिवस खाण्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. आमच्या cafeteriaत मिळणारं जेवण खूपच वेगळं होतं. त्यात मला cheese अजिबात आवडत नाही . त्यामुळे खायचं काय हा अगदी मोठ्ठा प्रश्न असे. माझा असा गोड गैरसमज होता की माझी खाण्याच्या बाबतीत काहीही तक्रार नाही. पण इथे मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी खोड काढत होते. Vegetable Soup मागवलं तर त्यात beef broth असायचा. Mac n Cheese, Pizza, baked Potatoes या सगळ्यात cheese नाही तर sour cream असायचं. बरं , आपल्याला नेमकं काय आवडेल हेच माहीत नसल्याने मी अमुक एक गोष्ट घालू नका हे सुद्धा सांगू शकत नव्हते.
तरी बरं , मी "मत्स्याहारी /मांसाहारी /Non Vegetarian" गटात मोडणारी होते. म्हणजे chicken, seafood आणि अंडी मी खाऊ शकत होते. माझ्या मैत्रिणीने मला "Wendies Spicy Chicken Sandwich #6" try करायला सांगितलं. पण एवढाला मोठा chickenचा तुकडा मला खातच येईना. Subwayतल Veggie Patty Sandwich? त्यात cheese आणि mustard/mayo मुळे मला आवडलं नाही. Burger King/McDonalds मधल्या Fish Sandwichमध्ये परत cheese/tartar sauce असायचं. Taco Bell मधल्या bean burritto मधलं अगदी पार पिठलं झालेले beans, मोडाच्या उसळी खाण्याची सवय असलेल्या माझ्या जिभेला सहन होईनात. पण, शेवटी आपल्यालाही सवय होते. कुठेही बाहेर खायचं असलं की काय काय घालू नका याची मी अगदी लांबलचक यादीच serverला सांगायचे. आमच्या group मधला एक मित्र तर मला नेहेमी चिडवायचा की एकदा ते लोक तुलाच आत त्यांच्या kitchen मध्ये नेतील आणि तुमचं तुम्हीच बनवा असं सांगतील.
नंतर लग्नानंतर, थोडे काही फेरफार करून मी हे नवे पदार्थ घरी करायला लागले आणि मला ते आवडलेही. राजमा Taco हा असाच एक माझा स्वनिर्मित पदार्थ!:-)
राजमा Taco
साहित्य
१ Taco packet (12 tacoes)
२ कप उकडलेले राजमा
मीठ चवीनुसार
१/२ कप salsa
१/२ टीस्पून जिरे पूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून काश्मिरी मिरची पूड
१ कप बारीक चिरलेले lettuce
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ लहान लिंबू
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला tomato
१ टेस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात
आवडीनुसार cheese , sour cream
कृती
१. उकडलेल्या राजम्यात मीठ, हळद, तिखट आणि salsa घाला. Gas वर ठेवून चांगले ढवळा. काही मिनिटातच पाणी आटेल तेव्हा gas बंद करा. बऱ्यापैकी थंड होऊ दे. लिंबू पिळून ढवळून घ्या.
२. Packet वरील सूचनेनुसार taco shells bake करून घ्या.
३. प्रत्येक taco आपापल्या आवडीनुसार राजमा, कांदा, tomato , कोथिंबीर , lettuce , कांद्याची पात , cheese/sour cream घाला.
४. आवडत असल्यास hot sauce घालू शकता.
टीप
१. हा लगेचच खाण्याचा प्रकार आहे. आधी करून ठेवल्यास अगदीच मऊ पडेल.

No comments:

Post a Comment