Monday, June 3, 2013

Tender Coconut 
मुंबईत असताना चौपाटीवर जाऊन शहाळं  पिऊन आतली मलई खरवडून खायची मजा काही औरच! पण इथे तो योग आला Miami त. South Beach वर जाण्यासाठी आम्ही निघालो होतो तेव्हा एक नारळवाला दिसला. गुडीयाने तोपर्यंत शहाळं पाहिलंही नव्हत. आमच्या मुंबईत नारळवाले कोयत्याने नारळ फोडतात. पण इथल्या मायामीकर नारळवाल्याचे उपकरण वेगळच होतं. त्याने म्हणे शहरातल्या नारळाच्या झाडांवरचे नारळ उतरवले होते आणि ते एका supermarket च्या कार्ट मध्ये ठेवले होते.
 
आमच्यासाठी खास (बर का!;-) त्याने एक शहाळं निवडलं आणि त्या कार्टवर अशी काही आपटायला सुरुवात केली की त्या शहाळ्याची शकलं झाली. मग त्याने ते हाताने सोलून आतला नारळ बाहेर काढला. दुसऱ्या एका नारळावर आपटला. मस्तपैकी straw खोचून तो आम्हाला दिला. पाणी अतिशय गोड होतं पण आमचा मुंबईकर शहाळवाला कसा नारळाचा एक तुकडा  आतली मलई खाण्यासाठी देतो, ती मात्र सोय नव्हती. पण तरीही मजा आली.

No comments:

Post a Comment